Yuvaskills Logo
Registration on GeM Started     |     PMEGP Scheme up to Rs. 25 Lac. with subsidy of 35%.     |     Enroll to seminar on 100 New Business Opportunities     |     Training for new Entrepreneurs on 03.03.2019        

नमस्कार मित्रांनो,

आपल्या देशामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे जास्त नव्हे एक 30 ते 40 वर्षापूर्वी म्हणले जायचे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नौकरी पण असे काय झाले कि हे सूत्र पुर्णपणे उलटे झाले व आत्ता सर्वोत्तम नौकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती झाले .

मित्रहो याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत आणि ते म्हणजे नौकरीत असणारे स्थैर्य (विशेष करून शासकीय नौकरीत शास्वत Growth) आणि नौकरीला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा.

मुळातच भारतीय समाज हा उद्योगप्रेमी होता पण गेल्या 35 ते 40 वर्षात हा चाकरीप्रिय झाला कारण वाढत्या महागाईला तोंड देताना नाकी नवु येणे व तिकडे शासकीय नौकरीत असणार्‍या व्यक्तीला वेतन आयोग लागू होणे ज्यामुळे अत्यं काटकसरीने जगणारा शेतकरी व व्यापारी आपल्या मुलाला व मुलीला जाणीवपूर्वक लहान- पणापासूनच नौकरी कडे आकर्षित होतील असे वातावरण निर्माण करायला सुरुवात केली व शेती व उद्योजकता म्हणजे बिना प्रतिष्ठेचे आहे हे बिंबवायला सुरुवात केली. या गोष्टीला पोषक वातावरण मिळत आहे ते शाळा व कॉलेजमधून. आपण पाहतो शाळा,कॉलेज अथवा कोणत्याही कार्यक्रमात सहज पणे प्रतिष्ठा व सामाजिक मान दिला जातो तो अधिकार्‍याला मग त्याचा ग्रेड कोणताही असो. एखादा शाळेतून अथवा समाजातून एखादा अधिकारी झाला कि त्याचा सर्व स्तरावर मोठा सत्कार घडवून आणला जातो, त्यामुळे सहजच येणार्‍या पिढीच्या मनावर हे रुजते कि अधिकारी होणे अथवा नौकरी करणे म्हणजेच प्रतिष्ठा आहे व त्यालाच किवा तिलाच समाजात प्रतिष्ठा आहे मग त्याची पावले त्याच दृष्टीने पडायला सुरू झाली व त्याचा रिझल्ट आपण आज पाहत आहोत.

जेव्हा खाजगीमध्ये चर्चा करतो तर यातील 80% अधिकारी अथवा नौकरी करणारे त्यांच्या कामाला वैतागलेले असतात व एखाद्या उद्योगाचा नेहमी विचार करतात. एखाद्या उद्योग सुरुवात करण्याची त्यांची क्षमता ही निर्माण झालेली असते पण उद्योजकाला सध्या कोठेही सामाजिक प्रतिष्ठा मिळत नसल्यामुळे त्यांची उद्योग क्षेत्रात येण्याची इच्छा कमी होते व आपल्या पाल्यालाही ते नौकरीच करणे कसे चांगले आहे हे समजवतात व त्या पाल्यालाही सगळीकडे नौकरी करणार्‍यालाच मिळणारी प्रतिष्ठा दिसते. आणखी एक आता प्रत्येक ठिकाणी करियर कौन्सिलिंग मोठ्या प्रमाणात केले जाते व यामध्ये उद्योजकता अथवा शेती हे एक करियर आहे याचा पुसटसा देखील कोठेही उल्लेख नसतो हे किती मोठे दुर्दैव्य आहे।

जोपर्यंत उद्योजक वाढत नाहीत तोपर्यंत विकास अशक्य आहे.

यावर उपाय काय तर उद्योजकाला व शेतकर्‍याला सामाजिक प्रतिष्ठा मिळायला हवी आणि ती कसे मिळेल तर आपल्या परिसरातील शाळा, कॉलेज व सामाजिक कार्यक्रमात उद्योजकाला बोलावणे त्याचा सत्कार करणे, आपल्याच शाळा व कॉलेजमधील यशस्वी व्यापारी, उद्योजकास महिन्यातून एखादा कार्यक्रम आयोजित करून त्याचा सत्कार करणे व त्यांची यशोगाथा एकवणे, समाजामध्ये अश्या व्यक्तीचा सत्कार करणे अश्याने उद्योजकाला प्रतिष्ठा मिळेल व येणारी पिढी उद्योजकतेकडे वळताना दिसेल.

तर उद्योजकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली तरच उद्योजकता वाढील लागेल व शास्वत विकास होईल.

मित्रहो, खालील लिंकला क्लिक करून आपण आणखी विविध माहिती पाहू शकता .


उद्योग कोठून व कसा सुरुवात करावा.

पाण्यात पडले की पोहता येते चूक की बरोबर

उद्योजकासाठी लागतात महत्वाचे दोन गुण

उद्योजकामध्ये असतातच हे गुण

प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा?

उद्योगाची व्याख्या

शासकीय योजनाची माहिती

धन्यवाद.

के.जी.कप्ते

प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार

7972542736.



Read More >>

मित्रहो,
CMEGP व PMEGP या दोन योजना छोट्या उद्योगासाठी शासनातर्फे राबवल्या जातात . CMEGP हि राज्य शासनाची व PMEGP हि केंद्र शासनाची दोन्हीमध्ये १५% ते ३५% सबसिडी दिली जाते . मी CMEGP या योजनेबद्दल याबद्दल सविस्तर यापूर्वी ब्लॉग मध्ये दिलेली आहे व व्हिडिओ सुद्धा बनवला होता. PMEGP योजनेची माहिती ब्लॉग द्वारे दिली होती . 

पण बरेच जण यापैकी कोणत्या योजनेतून कर्ज प्रस्ताव करावा याबद्दल कन्फयुज होतात हे मला येणाऱ्या प्रश्नावरून लक्षात आल्यामुळे मी दोन्हीपैकी कोणती योजना निवडावी याबद्दल सविस्तर विडिओ बनवला आहे .

 आपण या https://www.youtube.com/watch?v=_msVjfXzFPw लिंक वरून यू ट्यूब चॅनेल वरून जाऊन याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तसेच या चॅनेल वरील लाल बटन दाबून SUBSCRIBE करा व त्यानंतर येणारा बेल बटन दाबा म्हणजे मी यापूढे पोस्ट करणाऱ्या सर्व माहितीपर व्हिडिओ आपल्याला डायरेक्ट पाहता येतील . तसेच हा विडिओ शेअर करा व गरजू पर्यंत पोहोचू द्या . धन्यवाद.


Read More >>

मित्रहो,
उत्पादन व सेवा क्षेत्रातील दहा हजार गुंतवणकीपासून ते पन्नास लाखापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या 57 उद्योगाच्या माहितीपर व्हीडिओ बनवला आहे. https://youtu.be/4Iij-HggvwE या लिंक वर जाऊन आपण हा व्हिडीओ पाहू शकता.

धन्यवाद.
के.जी.कप्ते,
प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार
7972542736.



Read More >>

मित्रहो,
गेल्या आठवड्यात प्रवास करताना एक अनुभव आला, प्रवास करताना अचानक एका गृहस्थांची वर ठेवलेली बॅग खाली पडली व बस मध्ये एकच गोंधळ उडाला, लागल वगैरे कोणालाच नाही पण ज्याची बॅग होती त्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखं झाला होता.
बस व लक्झरी गाडी मध्ये प्रवास करताना प्रत्येक व्यक्ती आपली बॅग आपण बसतो त्याचा वर ठेवतो व प्रवासातून उतरेपर्यंत त्याच्या मनात धुकधूक असते बॅग नीट बसली का नाही, पडणार तर नाही, कोणी उचलून तर नेणार नाही ना,  यामुळे विनाकारण स्ट्रेस वाढते व प्रवास सुखकर होत नाही . यावर सोपा उपाय म्हणजे आपण ज्या बाजूला बसतो त्याच्या विरुद्ध बाजूला बॅग ठेवायचे म्हणजे बसल्या जागेवरून ते दिसते, पडण्यासारखे वाटले तर नीट करता येते, सहज पाहता येते म्हणून चोरीची भीती नाही. असे हार प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने आपली बॅग विरुद्ध बाजूला ठेवली तर प्रत्येकाला आप-आपली बॅग पाहता येते म्हणून सर्वांचाच प्रवास सुखकर होतो.
आपण रेल्वेत प्रवास करताना सुद्धा ज्या बर्थ वर आपला नंबर आहे त्याच बाजूच्या खालच्या सीटखाली बॅग व चप्पल काढून ठेवतो व रात्रभर काळजीत प्रवास करतो येथे सुद्धा विरुद्ध बाजूच्या सीटखाली ठेवल्यास आपण खालून वरपर्यंत कोणत्या बर्थवर असल्यास आरामशीर आपली बॅग बघू शकतो व प्रवास आरामदायी करू शकतो. बरेच जण हे करतही असतील पण जे करत नाहीत ते हे करून बघायला आणी आनंदाने प्रवास करायला हरकत नाही.
उद्योगाच्या विविध योजना, कायदे इ. ची माहितीसाठी माझ्या या https://www.youtube.com/channel/UCSj6sOo3unx_s7xQB2JOEwAyoutube चॅनेलला भेट देऊन subscribe करा.
धन्यवाद.
के.जी. कप्ते,
प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार,
7972542736.


Read More >>

मित्रहो,
आताच तुमच्यापैकी एका मित्राचा फोन आला होता व त्यांनी सांगितले त्याला एक मेसेज आलाय ज्यामध्ये लिहिलंय केंद्र शासनाची एक लाखांपासून ते १० कोटी कर्ज फक्त ३% व्याज ११ वर्षाची परतफेड ..मी त्यावरील नंबरला फोन केला पण No रिप्लाय ..
अश्या कोणत्या हि भुलथापाला बळी पडण्यापूर्वी खालील गोष्टी नक्की करा ...

१. आपण ज्या उद्योगाचा विचार करत आहोत त्याची प्राथमिक माहिती गोळा करावी.
ज्या योजनेत कर्ज प्रस्ताव करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती घ्या.
२. त्या प्राथमिक माहितीची सत्यता पडताळून पहावी.
३. संबधित उद्योगाचा मार्केट बद्दल अभ्यास करावा, यासाठी आता असंख्य साधने उपलब्ध आहेत.
४. प्रकल्पाचा निट अभ्यास करावा .
५. योग्य सल्लागार निवडून सल्ला घ्यावा व यासाठी थोडे पैसे मोजावे फुकटचा सल्ला घेवू नये.
६. सल्लागार योग्य निवडावा त्यासाठी त्याची माहिती घ्यावी आजकाल यासाठी सोशल मिडिया मध्ये सहज माहिती उपलब्ध होते व ज्या सल्लागाराने त्याची माहिती लपवलेली असते त्याच्याकडे जावू नये.
सल्लागारची भूमिका हवे ते प्राप्त करून देणारी असावी तसेच माहित नसल्यास माहित नाही असे प्रांजळपणे सांगणारी असावी .
सल्लागाराकडे जाताना आपल्या सर्व मुद्दाची यादी तयार करून घ्यावी जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे मुद्देसूद व वेळेत मिळतील. सल्ला घेताना स्वत; आपल्याला हवे असणारे मुद्दे नोंद करून घ्यावे .
७. आपल्याला कोणता उद्योगाला वाव आहे, शासनाच्या योजना काय आहेत, शासनाचे नियम काय आहेत, Terminology काय आहे, सुरुवात करताना कसे जावे लागेल या बाबतीत सल्ला नक्की घ्यावा.
८. सल्ला घेताना मात्र सल्लागार योग्य निवडावा आजकाल सल्ला देणारे खूप आहेत पण मार्गावर चाल्याचे आपल्याला असते व जो तो मार्गावर कधीच गेला नाही त्याच्याकडून सल्ला घेणे मंजे स्वत:चा खड्डा स्वत: खोदणे. सल्लागाराकडे गेल्यानंतर आपली खरी माहिती सांगणे म्हणजे योग्य सल्ला मिळतो.
९. आजकाल अर्धवट माहितीच्या आधारे बरेच लोक पुढे जातात व काहीही माहित नसणारी व्यक्ती  कडून सल्ला घेवून फसतात.
१०. कधीही सल्ला समोरासमोर घ्यावा - समोरासमोर सवांद होत असताना त्या विषयाच्या खोलामध्ये जाता येते.
जसे आपण डॉक्टर कडे जावून शरीराच्या बाबतीत सल्ला घेतो तसेच एखादा प्रकल्प चालू करताना त्यातील माहितगाराकडून सल्ला घेल्यास पुढील वाटचाल सुखकर होते व विनाकारण होणारी धावपळ, न दिसणारा खर्च, मानसिक त्रास होतो व वेळी वाया जाते.
मी आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहचावी म्हणून YOU-TUBE चॅनेल सुद्धा सुरुवात केलेले आहे त्याला SUBSCRIBE करा व केल्यावर येणाऱ्या बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे मी अपलोड केल्याबरोबर आपल्याला माहिती मिळेल. आपल्याला एखादी विशिष्ट माहिती पाहिजे असेल तर त्यावर कमेंट करा म्हणजे मी ततसा व्हिडिओ बनवून टाकेन. 
लवकरच उद्योग आधार ऑनलाईन कसा काढावा, बायोडाटा कसा तयार करावा, MSME डेटा बँक म्हणजे काय व कसा काढावा, फूड लायसनस ऑनलाईन कसे काढावे , पोल्युशन चा फॉर्म कसा भरावा , विनातारण कर्जासाठी फॉर्म कसा भरावा इ. बाबत व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे.
शेवटी फसू नका , काही शंका असल्यास मला कॉल अथवा व्हाट्सएप्प करा.


धन्यवाद.
के.जी.कप्ते,
प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार, पुणे . ७९७२५४२७३६. 


Read More >>