Yuvaskills Logo
Registration on GeM Started     |     PMEGP Scheme up to Rs. 25 Lac. with subsidy of 35%.     |     Enroll to seminar on 100 New Business Opportunities     |     Training for new Entrepreneurs on 03.03.2019        

नमस्कार मित्रांनो,

आपल्या देशामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे जास्त नव्हे एक 30 ते 40 वर्षापूर्वी म्हणले जायचे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नौकरी पण असे काय झाले कि हे सूत्र पुर्णपणे उलटे झाले व आत्ता सर्वोत्तम नौकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती झाले .

मित्रहो याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत आणि ते म्हणजे नौकरीत असणारे स्थैर्य (विशेष करून शासकीय नौकरीत शास्वत Growth) आणि नौकरीला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा.

मुळातच भारतीय समाज हा उद्योगप्रेमी होता पण गेल्या 35 ते 40 वर्षात हा चाकरीप्रिय झाला कारण वाढत्या महागाईला तोंड देताना नाकी नवु येणे व तिकडे शासकीय नौकरीत असणार्‍या व्यक्तीला वेतन आयोग लागू होणे ज्यामुळे अत्यं काटकसरीने जगणारा शेतकरी व व्यापारी आपल्या मुलाला व मुलीला जाणीवपूर्वक लहान- पणापासूनच नौकरी कडे आकर्षित होतील असे वातावरण निर्माण करायला सुरुवात केली व शेती व उद्योजकता म्हणजे बिना प्रतिष्ठेचे आहे हे बिंबवायला सुरुवात केली. या गोष्टीला पोषक वातावरण मिळत आहे ते शाळा व कॉलेजमधून. आपण पाहतो शाळा,कॉलेज अथवा कोणत्याही कार्यक्रमात सहज पणे प्रतिष्ठा व सामाजिक मान दिला जातो तो अधिकार्‍याला मग त्याचा ग्रेड कोणताही असो. एखादा शाळेतून अथवा समाजातून एखादा अधिकारी झाला कि त्याचा सर्व स्तरावर मोठा सत्कार घडवून आणला जातो, त्यामुळे सहजच येणार्‍या पिढीच्या मनावर हे रुजते कि अधिकारी होणे अथवा नौकरी करणे म्हणजेच प्रतिष्ठा आहे व त्यालाच किवा तिलाच समाजात प्रतिष्ठा आहे मग त्याची पावले त्याच दृष्टीने पडायला सुरू झाली व त्याचा रिझल्ट आपण आज पाहत आहोत.

जेव्हा खाजगीमध्ये चर्चा करतो तर यातील 80% अधिकारी अथवा नौकरी करणारे त्यांच्या कामाला वैतागलेले असतात व एखाद्या उद्योगाचा नेहमी विचार करतात. एखाद्या उद्योग सुरुवात करण्याची त्यांची क्षमता ही निर्माण झालेली असते पण उद्योजकाला सध्या कोठेही सामाजिक प्रतिष्ठा मिळत नसल्यामुळे त्यांची उद्योग क्षेत्रात येण्याची इच्छा कमी होते व आपल्या पाल्यालाही ते नौकरीच करणे कसे चांगले आहे हे समजवतात व त्या पाल्यालाही सगळीकडे नौकरी करणार्‍यालाच मिळणारी प्रतिष्ठा दिसते. आणखी एक आता प्रत्येक ठिकाणी करियर कौन्सिलिंग मोठ्या प्रमाणात केले जाते व यामध्ये उद्योजकता अथवा शेती हे एक करियर आहे याचा पुसटसा देखील कोठेही उल्लेख नसतो हे किती मोठे दुर्दैव्य आहे।

जोपर्यंत उद्योजक वाढत नाहीत तोपर्यंत विकास अशक्य आहे.

यावर उपाय काय तर उद्योजकाला व शेतकर्‍याला सामाजिक प्रतिष्ठा मिळायला हवी आणि ती कसे मिळेल तर आपल्या परिसरातील शाळा, कॉलेज व सामाजिक कार्यक्रमात उद्योजकाला बोलावणे त्याचा सत्कार करणे, आपल्याच शाळा व कॉलेजमधील यशस्वी व्यापारी, उद्योजकास महिन्यातून एखादा कार्यक्रम आयोजित करून त्याचा सत्कार करणे व त्यांची यशोगाथा एकवणे, समाजामध्ये अश्या व्यक्तीचा सत्कार करणे अश्याने उद्योजकाला प्रतिष्ठा मिळेल व येणारी पिढी उद्योजकतेकडे वळताना दिसेल.

तर उद्योजकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली तरच उद्योजकता वाढील लागेल व शास्वत विकास होईल.

मित्रहो, खालील लिंकला क्लिक करून आपण आणखी विविध माहिती पाहू शकता .


उद्योग कोठून व कसा सुरुवात करावा.

पाण्यात पडले की पोहता येते चूक की बरोबर

उद्योजकासाठी लागतात महत्वाचे दोन गुण

उद्योजकामध्ये असतातच हे गुण

प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा?

उद्योगाची व्याख्या

शासकीय योजनाची माहिती

धन्यवाद.

के.जी.कप्ते

प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार

7972542736.Read More >>

मित्रहो,
CMEGP व PMEGP या दोन योजना छोट्या उद्योगासाठी शासनातर्फे राबवल्या जातात . CMEGP हि राज्य शासनाची व PMEGP हि केंद्र शासनाची दोन्हीमध्ये १५% ते ३५% सबसिडी दिली जाते . मी CMEGP या योजनेबद्दल याबद्दल सविस्तर यापूर्वी ब्लॉग मध्ये दिलेली आहे व व्हिडिओ सुद्धा बनवला होता. PMEGP योजनेची माहिती ब्लॉग द्वारे दिली होती . 

पण बरेच जण यापैकी कोणत्या योजनेतून कर्ज प्रस्ताव करावा याबद्दल कन्फयुज होतात हे मला येणाऱ्या प्रश्नावरून लक्षात आल्यामुळे मी दोन्हीपैकी कोणती योजना निवडावी याबद्दल सविस्तर विडिओ बनवला आहे .

 आपण या https://www.youtube.com/watch?v=_msVjfXzFPw लिंक वरून यू ट्यूब चॅनेल वरून जाऊन याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तसेच या चॅनेल वरील लाल बटन दाबून SUBSCRIBE करा व त्यानंतर येणारा बेल बटन दाबा म्हणजे मी यापूढे पोस्ट करणाऱ्या सर्व माहितीपर व्हिडिओ आपल्याला डायरेक्ट पाहता येतील . तसेच हा विडिओ शेअर करा व गरजू पर्यंत पोहोचू द्या . धन्यवाद.


Read More >>